पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवनी अंतर्गत फिर्यादी नामे अब्दुल गफार अब्दुल करीम, वय ७९ वर्ष, रा गांधी चौक पारशिवनी हे त्यांचे पत्नी सह घरी हजर असताना अनोळखी इसमांनी फिर्यादीचे घरात घुसुन फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीच्या गळयातील १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र किंमती ५०,०००/- रू जबरीने ओढुन काढुन घेतले. तसेच किचन रूम मध्ये जावुन रूममध्ये असलेले लोखंडी कपाट उघडुन अंदाजे १०००/- रू लुटुन मोटरसायकलने पळुन गेले. अश्या फिर्यादीचे तोंडी रीपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे दिनांक १३/१२/२०२५ रोजी अपराध कमांक ५९४/२५ कलम ३०९ (६), ३(५), भान्यासं, सन २०२३ गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हयाचे गांर्भिय लक्षात घेता वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पारशिवणी पोलीसांसोबत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण यांनी सुध्दा तात्काळ सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू केला. अवघ्या १२ तासात स्थानिक गुन्हे शाखा यांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनिय बातमीदारांच्या माहिती वरून आरोपी १. मंगेश रतीराम उईके, वय २६ वर्ष राहणार धापेवाडा यास ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस करून आरोपीने मुख्य आरोपी २. तनवीर युनुस कुरेशी, रा. धापेवाडा याचे सांगणे वरून इतर साथीदार आरोपींचे मदतीने गुन्हा केल्याचे सांगितल्याने सदर गुन्हयात आरोपी कं १ आणि २ यांच्या सह आरोपी कं ३. प्रवीण देवराव महीकारकर, वय २८ वर्षे, राहणार इंदिरानगर वार्ड क्रमांक १२, ब्राह्मणी, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर ४. कमलेश उर्फ छोट्या दिलीप पंधराम, वय २१ वर्ष, राहणार इंदिरानगर तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर, ५. अक्षय राजकुमार बनसोड, वय २२ वर्षे, राहणार राडगाव डोरली, मुक्काम कळमेश्वर इंदिरानगर झोपडपट्टी, ६. आदित्य महेंद्र शर्मा, वय २१ वर्षे, राहणार ब्राह्मणी शिक्षक कॉलनी यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयातील आरोपी के ७. अब्दुल मतीन अब्दुल गफार शेख, वय ५२ वर्ष, राहणार पालोय तालुका पार्सल जिल्हा नागपूर हा फिर्यादीचा मुलगा असुन त्यानेच त्याचे वडिलांसोबत मालमत्तेच्या हिस्से वाटणीचे मत भेद असून त्याने गुन्हयातील इतर आरोपींना माझे वडिलांकडे प्रॉपर्टी विक्रीचे खूप रुपये आहेत घरात घुसून लुटून घ्या अशी माहिती दिल्या वरून गुन्हा केल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे नमुद आरोपीतांनी २०२४ मध्ये फिर्यादीचे घरात घुसून चाळीस हजार रुपये जबरीने चोरी करून नेल्याचे उघड केले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १) रोख रक्कम नगदी ९५००/- रुपये २) मोसा क्र. एम एच ४० झेड ५२८८ किंमती ५०,०००/- रूपये ३) मोसा क्र एम एच ४० ए एन ७९२२ किंमती ५०,०००/- रू ४) ०२ अँड्रॉइड मोबाईल ५) १ कीपॅड मोबाइल असा एकुण १,५५,५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
१) पोलीस ठाणे पारशिवनी अप.क्र. ५९४/२५ कलम ३०९ (६), ३ (५),३१० (२), ३११ भा.न्या.सं.
२) अप. क्र. २०/२४ कलम ३९४, ४५८ भादंवी
सदर आरोपीतांना अटक करण्यात आली असुन पुढील तपास पारशिवणी पोलीस करीत आहेत.








