spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाचा एन्कोस कार्यक्रम सात वर्षांनंतर खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड.मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे महिला आरोग्य संघटना कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन

अमरावती :- सार्वजनिक आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा करून नागरिकांना अधिक प्रभावी, विश्वासार्ह व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारकडून एन्कोस (ENCoS – National Quality Assurance Standards अंतर्गत) हा एकाच छत्राखालील कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून आरोग्य सुविधांची गुणवत्ता व विश्वासार्हता वाढविण्यावर विशेष भर दिला जात आहे.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका भातकुली यांची निवड करण्यात आली असून, राज्यातून तब्बल सात वर्षांनंतर प्रथमच ही संधी प्राप्त झाली आहे. ही निवड राज्य, जिल्हा तसेच स्थानिक स्तरावर करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे मत यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसवले, तालुका वैद्यकीय अधिकारी श्वेता सालफडे, खोलापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, डॉ गजानन खोकले डॉ.मेश्राम, डॉ पारडे,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य संघटना कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

नागपूर येथील अधिवेशन काळात उपसंचालक, नागपूर कार्यालयात बैठकीसाठी आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेत पुष्पा वानखडे, चंदा बेलसरे, दिपाली शिंदे, पद्मा जाधव, सुनंदा नाथे, मोनिका भोवते, सुवर्णा उके, लक्ष्मी बनसोड, पूनम नांदुरकर, निकिता गणवीर, सुजाता बनसोड, वीणा चव्हाण, संगीता लोखंडे, पार्वती चाचूरकर, कुंदा गादे, मीरा भास्करे, शिल्पा बन व मंगला पडोळे , स्वाती अळसपूरे,आदी महिला पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.

Popular Articles