spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू काढणाऱ्या इसमावर गुन्हा नोंद

देवलापार :- रमेश बरकते, उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, मौजा मुरडा जंगल शिवार येथे मोहाफुल हातभट्टीची दारू काढल्या जात आहे. अशी माहीती प्राप्त होताच श्री रमेश बरकते यांनी देवलापार पोलीस स्टेशन आणि उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय, रामटेक येथील अधिकारी अंमलदाराच्या पथकासह नमुद ठिकाणी जावुन रेड केली असता नमुद ठिकाणी नाल्याच्या काठावर हातभट्टी लावलेली दिसली. आरोपी नामे विनोद सुखदेव धुर्वे, रा. मुरडा, ता. रामटेक हा पोलीस पथकाला पाहुन पळुन गेला, पोलीसांनी सदर हातभट्टी नष्ट करून घटनास्थळावरून १) ३०० लिटर मोहाफुल सडवा रसायन किंमती १५,०००/- रू. २) ६० लिटर मोहाफुल गावठी दारू किंमती ६,०००/- रू. ३) लोखंडी ड्रम ४) जळावु लाकडासह इतर साहित्य असा एकुण २५,३५०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. आरोपीविरुद्ध कलम महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Popular Articles