spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे विजेत्या कुस्तीपटूंना बक्षिसाचे वितरण

किशोर साहू, मौदा, ता १९ :- चाचेर येथे नववर्षाच्या शुभप्रसंगी व मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तीन दिवसीय मंडई उत्सव कार्यक्रमाची सुरुवात आमदंगल ने झाली. आमदंगलचा कार्यक्रम हनुमान मंदिर परिसर आजनी रोड या ठिकाणी पार पडला. यात अनेक प्रतिभावंत कुस्ती पैलवान लोकांनी सहभाग घेऊन अनेक कुस्तीपटूंनी अंगी असलेल्या आपल्या गुणांचा कला कौशल्य दाखवून अनेक कुस्तीपटू विजयी झाले. स्पर्धेमध्ये बाहेरगावावरून आलेल्या अनेक पैलवान कुस्तीपटू यांनी आपले कला कौशल्य दाखविले.सर्व विजयी कुस्तीपटूना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक व विशेष बक्षीस देण्यात आले.

याप्रसंगी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती लक्ष्मण उमाळे (पाटील),डॉ. दिनेश कोपरकर, माजी सरपंच महेश कलारे, प्रमोद बरबटे, भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण किसान आघाडी मंत्री विनोद कोपरकर, खंडाळा( गांगणेर) सरपंच संकेत झाडे,डॉ. दिनेश बादुले, शैलेश कोपरकर,कवडू मेश्राम, वरप्रसाद वाक्कलपूडी , प्रभाकर दरवई,योगेश निनावे, वासुदेव सोमकुवर, ज्ञानेश्वर नाकाडे, भोला बावनकुळे, कृष्णा खडसे, अशोक बावनकुळे, बाल्याभाऊ देशमुख, सुरेंद्र टेभरे, निशांत बरबटे,विजय काळे, प्रकाश काळे, लक्ष्मण काळे,अशोक झाडे, गोपीचंद राऊत,रामुजी खंडाईत, बेनीराम मोहने, राजू महादुले, वसंता साखरवाडे, मदन बरबटे, प्रल्हाद काळे, विनायक किटे, अनंता काळे, मल्लू गडे, नंदू काळे, लक्ष्मण कांबडे,चुडामन हुमणे, राजु धोटे सह अनेक मान्यवर मंचकावर वर उपस्थित होत. याप्रसंगी विशाल जनसमुदाय उपस्थित होता.सर्वांचे मंडई उत्सव समितीच्या वतीने व ग्रामपंचायतच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

Popular Articles