spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय-निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, खापा मध्ये गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा

खापा :- शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण व झेंडावंदन करुन शहिदांना मानवंदना दिली.

बाजार चौक स्थित गांधी पुतळा येथे शहरातील माजी शिक्षक गुलाबराव उफाट यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. न. प. खापा नगराध्यक्ष पियूष बुरडे, नगरसेवक मिलिंद बुरडे, संजय सोनकुसळे, छगन कवडे, नगर काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, अशोक दंदे, नारायण लांबट, राजेश बावणे, शंकर गोखे, किशोर बुरडे, सुरेश मारोतकर व शहरांतील सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका व शहरातील सर्व सन्माननीय नागरिकांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला.

खापा नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष पियुष बुरडे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. याप्रसंगी वैभव गोडे, प्रमोद लकडकर, ज्ञानेश्वर सोनवाणे, चव्हाण, बंटी मोगरे, रोशन अंतुरकर, बिजेकर, अनुप लखपती, कपिल निनावे आदी कर्मचारी उपस्थित होते.

न.प. राजेंद्र हायस्कुल व जूनियर कॉलेज खापा येथे न. प. खापा उपनगराध्यक्ष सुनिल पाहुणे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नेहारे, पर्यवेक्षक शामराव खडसे, सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती केली.

जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे ॲड. चंद्रशेखर बरेठीया हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गजभिये तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व सर्व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विवीध सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती केली. केदारनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घवघवीत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश तालपल्लीवार यांच्या हस्ते शिल्ड वाटप करण्यात आल्या.

न. प. जिजामाता प्राथमिक शाळा, खापा येथे नगरसेविका अंजली आनंद मेनकुदळे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश वाहाने, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस स्टेशन खापा येथे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी सर्व पोलीस कर्मचारी, होमगार्ड पथक, सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

सर्व विद्यालयाच्या वतीने देशभक्तीपर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात हर्शोल्लासात राष्ट्रीय सण साजरा करण्यात आला.

Popular Articles