spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उत्कृष्ट आपदा मित्र श्याम मस्के यांचा पालकमंत्री बावणकुळे च्या हस्ते गौरव

कन्हान :- नागपुर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शोध व बचाव कार्य तसेच जनजागृती मोहिम या मध्ये कार्य करून समाजहीत कार्यामध्ये मोलाचे योगदान व सहकार्य केल्याबद्दल कांद्री-कन्हान येथिल श्याम संभाजी मस्के यांना उत्कृष्ट आपदा मित्र म्हणुन पालकमंत्री मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

सोमवार (दि.२६) जानेवारी २०२६ ला कस्तुरचंद पार्क नागपुर येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा प्रजास त्ताक दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यात सक्रिय युवक युवती यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल गौरविण्यात आले. नागपुर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शोध व बचाव कार्य तसे च जनजागृती मोहिम यामध्ये विशेष कार्य करून समा जहीत कार्यात मोलाचे योगदान व जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य केल्याबद्दल आपदा मित्रा मधुन उत्कृष्ट आपदा मित्र म्हणुन नागपुर जिल्ह्यातुन श्याम संभाजी मस्के आणि वैष्णवी बावणे यांची निवड करण्यात आली आणि त्यांना महसुल मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेक क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचा हस्ते सन्मानचिन्ह,सन्मान पत्र देऊन सन्मानित करून गौरव करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नागपुर जिल्हयातुन उत्कृष्ट आपदा मित्र म्हणुन कांद्री येथिल रहिवासी श्याम संभाजी मस्के यांचा गौरव करण्यात आल्याने कन्हान, कांद्री परिसरातुन श्याम मस्के यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles