spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; दिग्गज नेत्यांची लाभणार उपस्थिती

हंसराज, प्रतिनिधी भंडारा लाखांदूर :- जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) च्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक ३१ जानेवारी, ०१ व ०२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोच्छी ता. लाखांदूर जि. भंडारा येथील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.

सदर महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, दिनांक ३१ जानेवारी २०२६ ला ना. पंकज भोयर, पालकमंत्री, जिल्हा भंडारा यांचे हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना पटोले, आमदार, साकोली विधानसभा हे असणार आहेत.

विशेष अतिथी प्रफुल्ल पटेल, खासदार, राज्यसभा, डॉ. प्रशांत पडोळे, खासदार लोकसभा, भंडारा-गोंदिया, डॉ. परिणय फुके, विधान परिषद सदस्य, अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य, सुधाकर अडबाले, विधान परिषद सदस्य, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, कविता उर्ईके, अध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा, सावन कुमार, जिल्हाधिकारी, भंडारा, मिलिंदकुमार साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि प भंडारा, नूरुल हसन, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा, एकनाथ फेंडर, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा, नरेश ईश्वरकर, सभापती, शिक्षण व बांधकाम, जि प भंडारा, आनंद मलेवार, सभापती, आरोग्य व बांधकाम, शीतल राऊत, सभापती, जि प भंडारा, अनिता नलगोपुलवार, सभापती, जि प भंडारा, पंकज तंतरपाळे, संस्थापक अध्यक्ष, अजित पवार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, सुरेखा देसाई, सरपंच ग्रामपंचायत, कोच्छी, मुरलीधर वावरे, उपसरपंच, स्वागताध्यक्ष नरेश ईश्वरकर, सभापती,शिक्षण व बांधकाम, सह स्वागताध्यक्ष प्रियंक बोरकर, जि प सदस्य तसेच सर्व जि प सदस्य, जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती सभापती, उपसभापती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

प्राथमिक गटाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन एकनाथ फेंडर, उपाध्यक्ष, जि प, भंडारा यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी आनंद मलेवार, सभापती, आरोग्य व अर्थ व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी दि. ०१ फेब्रुवारीला उच्च प्राथमिक गटाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन शितल राऊत, सभापती, समाजकल्याण, यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष स्थानी अनिता नलगोपूरलवार, सभापती, महिला व बालकल्याण ह्या असणार आहेत. तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्या, सरपंच, ग्राम पंचायत, कोच्छी ह्या उपस्थित राहणार आहेत.

दिनांक ०२ फेब्रुवारीला सदर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण दुपारी ०४-०० वाजता आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी कविता उईके, अध्यक्ष, जि प भंडारा ह्या असणार आहेत. विशेष अतिथी सावन कुमार, जिल्हाधिकारी, मिलिंदकुमार साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, नुरुल हसन, पोलीस अधीक्षक, डॉ. शिवलिंग पटवे अध्यक्ष, विभागीय मंडळ, नागपूर, माधुरी सावरकर, उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर, राजेश रुद्रकार, प्राचार्य, डाएट भंडारा, निलेश कदम, उपविभागीय अधिकारी, साकोली, शिवम विसापुरे, उपविभागीय , पोलीस अधिकारी, साकोली, प्रमोदकुमार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विवेक बोंद्रे, प्रकल्प संचालक, संजय जोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र), उमेश नंदागवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), माणिक चव्हाण, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, संदिप बोरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, डाॅ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, सौ. लतिका लेकुरवाळे, वैभव पवार, तहसीलदार, लाखांदूर, सचिन पवार, पोलीस निरीक्षक, लाखांदूर तसेच सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय क्रीडा सांस्कृतिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांचे सांघिक, वैयक्तिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सदर कार्यक्रमाला गावकरी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग तथा पालक वर्ग यांनी सहकार्य करावे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, यासाठी प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन श्री नरेश ईश्वरकर, स्वागताध्यक्ष तथा सभापती, शिक्षण व बांधकाम, सह स्वागताध्यक्ष प्रियंक बोरकर, जि प सदस्य, रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), मनीषा गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी केले आहे.

Popular Articles