spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू बाळगुण विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध १२ गुन्हे नोंद

भिवापूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन विदेशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ६,९४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन भिवापूर अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन उमरेड अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन वेलतूर येथे ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बेला अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत ०५ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन खापा अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन जलालखेडा अंतर्गत ०१ गुन्हा नोंद आहे. असे एकुण महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये १२ गुन्हे दाखल केले आहे.

सदर कारवाईत ८७३ मिली विदेशी दारू, २६ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ६,९४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles