spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महादेव घरडे यांचा ‘धम्म भुषण’ पुरस्काराने सन्मान

– आंबेडकरी व फुले-शाहु चळवळीतील कार्याचा गौरव

यवतमाळ :- चिकणी डोमगा येथील आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि धम्म प्रचारक महादेव बापूराव घरडे यांना महाबोधी बहुउद्देशीय संस्था वटफळीच्या वतीने आयोजित धम्मपरिषदेत ‘धम्म भुषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भदंत नागघोष महाथेरो आणि डॉ. एच. आर. धम्मदिप महाथेरो यांच्या हस्ते तसेच आयोजन समितीच्या वतीने बौद्ध धम्म चळवळीतील योगदानाबद्दल घरडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक समता परिषद नेरच्या वतीने त्यांना ‘फुले-शाहु-आंबेडकरी कार्यकर्ता पुरस्कार’देखील प्रदान करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड, प्रा. जोंगेद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नागदेव खोब्रागडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. घरडे गेल्या तीन दशकांपासून ग्रामीण भागात धम्म प्रचार, प्रसार तसेच सामाजिक समता व अधिकारसंबंधी कार्य करीत आहेत.

घरडे यांना यापूर्वी भारत सरकारच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार, अकोला येथील सेवावी पुरस्कार, तसेच राज्यस्तरीय समाज प्रबोधन सिंधुरत्न पुरस्कार आणि पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीनबंधु पुरस्कार मिळाले आहेत. कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे महादेव घरडे यांचे सामाजिक कार्य आणि धम्म प्रचारातील योगदान सार्वजनिक स्तरावर मान्यता प्राप्त झाले आहे, ज्यामुळे युवावर्गाला प्रेरणा मिळत आहे.

Popular Articles