spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांदन रस्ता बांधकामातील अडथळे दुर करा – सरपंच सावरकर

– शेतकरीच ठरत आहे पांदन रस्ता बांधकामात अडसर

– तहसिलदारांनी लक्ष घालण्याची सरपंच संदीप सावरकर यांची मागणी

रामटेक :- शेतकरी हिताच्या असलेल्या पांदन रस्त्यांच्या बांधकामात अनेक अडचणी येत आहे. स्वतः शेतकरीच या पांदण रस्त्यांच्या बांधकामात अडथळे निर्माण करीत असून आता तहसीलदारांनीच यात लक्ष घालून व सदर समस्या मार्गी लावून पांदण रस्त्यांचा मार्ग सुकर करावा अशी मागणी गट ग्रामपंचायत मानापुरचे सरपंच संदीप सावरकर यांनी केलेली आहे.सरपंच संदीप सावरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गट ग्रामपंचायत मानापुर अंतर्गत १३ पांदण रस्ते मंजुरी मिळाली. बिना अडथळा केवळ एकच पांदण रस्ता पूर्ण झाला. तर इतर १२ पांदण रस्त्याच्या कामात शेतकरी आपल्या शेताच्या सीमेवरून वाद उत्पन्न करत असतात. कुणी म्हणतात माझ्या शेतीची सिमा एवढी आहे त्याच्या शेतीची सीमा तेवढी आहे तेव्हा पांदन रस्ता थोडा तिकडं घ्या किंवा इकडं घ्या असे म्हणत अडथळा निर्माण करीत आहे. वास्तविक रस्त्याच्या बांधकामात शेतकरीच अडचणी निर्माण करत आहेत असे सरपंच संदीप सावरकर यांनी सांगितले. तेव्हा आता उर्वरीत बारा पांदन रस्त्यांचे बांधकाम कसे करावे हा विचार सरपंच सावरकर करीत आहे. तेव्हा आता तहसीलदारांनी या समस्येत लक्ष घालून पांदण रस्त्याची कामे पूर्ण करावीत अशी मागणी मानापुरचे सरपंच संदीप सावरकर यांनी केलेली आहे.

Popular Articles