spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेसाठी झाकी पूजन सोहळा उत्साहात संपन्न

नागपूर :- रामनवमी निमित्त पोदारेश्वर मंदिरातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या आकर्षक झाकीचे पूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा रेशीमबाग येथील माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता.

आमदार मोहन मते यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे कुलदीप माटे, केतन साठवणे, अक्षय खराबे व उदय ढोमणे यांच्या नेतृत्वात माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, आमदार मोहन मते मित्र परिवार तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या झाकीचे विधिवत पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार मोहन मते, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, दक्षिण नागपूरमधील नगरसेवक, भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर तसेच युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या झाकीच्या माध्यमातून १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा भव्य देखावा साकारण्यात आला होता. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसर “जय श्रीराम”च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

Popular Articles