spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे साजरी

कन्हान :- राष्ट्रसंत तुकडोजी महराज यांची ११७ वी जयंती ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे संस्थेचे ” शिवरत्न ” कार्यालय कन्हान येथे वैद्यकिय शिबीराने साजरी करण्यात आली.

गुरूवार (दि.३०) एप्रिल ला ग्रामौन्नती प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून सामुदायिक प्राथना करून वैद्यकिय शिबीराची सुरूवात करण्यात आली. यात नागपुर चे डॉ. विजेता आणि सहकारी यांनी रूग्णाची कँल्शियम ची कमतरता आणि ऑरथो तपासणी करून योग्य औषधी देऊन ५४ जेष्ट नागरिक रूग्णाच्या आजाराचे समाधान करून राष्ट्रसंत तुकडोजी महराज यांची ११७ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रकाश जाधव, कमलेश पांजरे, मोतीराम रहाटे, नेवालाल पात्रे, सचिन साळवी, रूपेश सातपुते, प्रशांत येलकर, निशांत जाधव, संकल्प भोगे, प्रविण मंदुरकर सह ग्रामौन्नती प्रतिष्ठाण चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.