spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे महाराष्ट्र दिन ,कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा साजरी

किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. 1 मे) ला प्रनाग हायस्कूल आजनगाव येथे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बुद्ध पौर्णिमा तिन्ही दिवस संयुक्तिकरित्या मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले.

महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष गुणरत्न गजभिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाचे महत्त्व कामगार दिनाचे औचित्य आणि गौतम बुद्धांचे विचार सांगितले.

कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापिका कु. शालिनी बाबुलकर ,गुणरत्न गजभिये, शिक्षकवृंद एस. एस. टांगले, आर . आय. गेडाम शिक्षकेतर कर्मचारी डोंगरे व विद्यार्थी उपस्थित होते.

Popular Articles