किशोर साहू, मौदा :- पीएमश्री जि प शाळा चाचेर येथील विद्यार्थी सक्षम जीवन सहारे याची नवोदय विद्यालय निवड झालेली आहे.
सक्षम ने आपल्या निवडीचे श्रेय त्याचे पालकवर्ग, शाळेतील शिक्षक ठाकरे, राऊत, शिक्षिका साखरकर व सर्व शिक्षकवृंद यांना दिले असून, त्यांच्या अमूल्य मार्गदर्शन, अथक परिश्रम, प्रेरणा आणि वेळोवेळी दिलेला आत्मविश्वास यामुळे हे यश संपादन करता आल्याचे सक्षम ने सांगितले.
सक्षमच्या या यशाबद्दल समस्त ग्रामवासीयांतर्फे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.