spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा-गोंदिया विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 7 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन अर्ज दाखल

हंसराज भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. 27 मे ते 1 जून दरम्यान आज नामनिर्देशनाच्या अंतिम दिवशी एकूण 7 उमेदवारांनी 11 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.                                                                                                        दाखल झालेल्या अर्जांमध्ये :

प्रफुल्ल गोपालदास अग्रवाल (अपक्ष) – 3अर्ज

बनसोड दिलीप वामन (इंडियन नॅशनल काँग्रेस) –1

अविनाश आनंदराव ब्राह्मणकर(भाजप) – 2 अर्ज,

अभिषेक जगदीश कारेमोरे 2अर्ज(भाजपा/अपक्ष)

सचिन यशवंत कुंभलकर अपक्ष १ अर्ज, नरेश माणिक ईश्वरकर अपक्ष १ अर्ज, भास्कर ओंकार रहांगडाले अपक्ष १ अर्ज यांचा समावेश आहे.

नामनिर्देशन अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 आहे. मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल, तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.