spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास व शैक्षणिक प्रगती साधता येते; पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचे प्रतिपादन

हंसराज,भंडारा :- भंडारा पोलीस स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित बास्केटबॉल कॅम्पचा समारोप नुकताच पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ८ बास्केटबॉलपटूंसह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नूरुल हसन म्हणाले की, क्रीडा क्षेत्रात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे इंटरपर्सनल स्किल्स सुधारतात आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. खेळाचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक (Academics) प्रगतीवरही होतो, असेही त्यांनी नमूद केले.

भंडारा पोलीस दलाकडे आता दर्जेदार क्रीडा इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध झाले असून, जिल्ह्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लवकरच ‘भंडारा पोलीस स्पोर्ट्स क्लब’ अधिकृतपणे सुरू करण्यात येणार आहे. या क्लब अंतर्गत बास्केटबॉलसह खो-खो, कबड्डी, वॉलीबॉल आणि क्रिकेट यांसारख्या खेळांचे नियमित सराव व स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Popular Articles