spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मोहरम उत्साहात, शहरात विविध ठिकाणी शरबत महाप्रसाद वितरण

खापा, वार्ताहर :- मोहरम हा सण हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हसन हुसेन यांच्या शहादतमध्ये (शहीद ) साजरा केला जातो. जितके मुस्लिम बांधव मोहरम या सणाला मानतात तितकेच हिंदू बांधव सुद्धा मोहरम साजरा करतात. खापा येथे सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन मोहरम सण साजरा करतात. खापा येथे मुस्लिम व हिंदू यांच्यातील असलेली एकता यामधून दिसून येते.

मोहरम हा इस्लामी नववर्षाचा पहिला महिना असुन मोहरमच्या १ तारखेपासून या सणाला सुरवात होत असून मोहरमची ९ व १० तारीख अत्यंत महत्वाची मानली जाते. मोहरमच्या ९ तारखेला (२५ जुलै) खापा येथे मस्जिद मध्ये मिलाद झाली आणि खापा मस्जिदचे शाही इमाम मकसुद आलम यांनी सर्वांसाठी दुआ केली.

मोहरमच्या १० तारखेला (२६ जुलै) मदार शाह बाबांच्या निंबाच्या झाडाखाली नवयुवकांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. बँक ऑफ बडोदा जवळील या भारत मोबाईल व ताज मोबाईल शॉप येथे शरबत वितरण करण्यात आले. चांदशाह वली दर्गा येथे दर्गा कमिटीच्या वतीने शरबत वितरण करण्यात आले. बाजार चौक येथील बब्बू सायकल स्टोअर जवळ शरबत वितरण करण्यात आले. बोंदरे भवन येथे गौरव बोंदरे मित्रपरिवार तर्फे शरबत वितरण करण्यात आले.

गांधी पुतळ्याजवळ शहरातील प्रसिद्ध तीर्थस्थळ सैय्यद बाबा लष्कर शाह शहीद दर्ग्याच्या मुजावरांद्वारे बनविण्यात आलेल्या ताजीयाचे शेकडो भक्तांनी पूजा अर्चना करून दर्शन घेतले.

मोहरम निमित्त इमरान अली सैय्यद, युनुस कुरेशी, सईद कुरेशी, मस्तान कुरेशी, अहेफाज कुरेशी, मकसूद शेख, अझरुद्दीन शेख, कुद्दुस कुरेशी, इमरान शेख, गोलू शेख, शकील कुरेशी, शाहिद खान, ज़ोहब कुरेशी, मुजाहिद कुरैशी, अल्तमश कुरैशी व हाजी बाबा उर्स कमेटी आणि समस्त शहरवासीयांनी आयोजनासाठी सहकार्य केले.

खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात करुण सुव्यवस्था ठेवली. दरवर्षी प्रमाने यावर्षी मोठ्या प्रमाणत नागरिकांनी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

Popular Articles