spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

निर्मल नगरीतील श्री संत गजानन महाराज मंदिरात ३६ वे सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथ पारायण संपन्न

– पोलीस निरीक्षक कोळी यांचं सुनील बालपांडे यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार व स्वागत

नागपूर :- उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात रविवारी आयोजित करण्यात आलेले ३६ वे सामूहिक श्री गजानन विजय ग्रंथ पारायण अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित या वार्षिक धार्मिक सोहळ्यास नागपूर शहरातील व परिसरातील हजारों भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सकाळी श्रींच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण, प्रकट वाचन, महाआरती आणि नामस्मरणाचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. मंदिरातील “गण गण गणात बोते” आणि भजनाच्या जयघोषाने दुमदुमून गेला. दुपारी 12 वाजता सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या सेवकांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी मानकापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पीआय) कोळी साहेब यांचा सुनीलदादा बालपांडे यांच्या हस्ते शाल देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित भाविकांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत अशाच धार्मिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी भावना व्यक्त केली. या धार्मिक सोहळ्यामुळे भक्तिमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, उपस्थित भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन पारायणाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.