spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नाशिक महाकुंभ स्वच्छतेसाठी इनरव्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटीचा खारीचा वाटा

नागपूर :- आगामी नाशिक महाकुंभ यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियानाला हातभार लावत इनरव्हील क्लब ऑफ नागपूर ऑरेंज सिटी (डिस्ट्रिक्ट ३०३) यांच्या वतीने दोन मोठ्या कचरा पेट्या (डस्टबिन) प्रदान करण्यात आल्या. ‘आरोग्याचा मार्ग स्वच्छतेकडूनच जातो’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महाकुंभसारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात स्वच्छता राखणे ही सामूहिक जबाबदारी असून, त्यासाठी इनरव्हील क्लबने आपल्या सामाजिक बांधिलकीतून हा खारीचा वाटा उचलला आहे. हा उपक्रम डिस्ट्रिक्ट ३०३ च्या विशेष प्रकल्पांतर्गत राबविण्यात आला. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन मनीषा चौधरी, क्लब अध्यक्षा स्मिता बागडदेव, डिस्ट्रिक्ट आयएसओ स्वाती वानकर, पूर्वाध्यक्षा शारदा रोशनखेडे, आयएसओ वैशाली चिंचोळकर, खजिनदार सुप्रिया पाठक, क्लब एडिटर सीमा मेटांगळे यांच्यासह क्लबच्या सर्व माजी अध्यक्षा व एकूण १८ सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपत स्वच्छता अभियानात दिलेले हे योगदान प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Popular Articles