spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामगार कल्याण केंद्र, कामठी येथे सौंदर्यशास्त्र प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप

– महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग; प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन व गौरव

कामठी :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट क्रमांक १ अंतर्गत कामगार कल्याण केंद्र, कामठी येथे आयोजित सौंदर्यशास्त्र (ब्युटी केअर) प्रशिक्षण शिबिराचा सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. १ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या प्रशिक्षण शिबिरात महिलांना ब्युटी केअर क्षेत्रातील आधुनिक तंत्र, कौशल्य आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

हे शिबिर श्रीकांत धोत्रे, सहाय्यक कल्याण आयुक्त, नागपूर विभाग तसेच छोटू जाधव, कामगार कल्याण अधिकारी (गट क्र. १) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणामुळे महिलांच्या कौशल्यविकासाला चालना मिळून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता नितीन रावेरकर (ब्युटी केअर सलून) उपस्थित होत्या. महिनाभर प्रशिक्षण देणाऱ्या विता अनिल रथकंठीवार यांनी प्रशिक्षणार्थींना सौंदर्यशास्त्रातील व्यावहारिक ज्ञान, ग्राहक सेवा, सौंदर्य उपचार आणि व्यवसाय व्यवस्थापनाची माहिती दिली. नीलू शामकुवर यांनी प्रशिक्षिका म्हणून मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता आगे, महिला कल्याण सहायिका यांनी केले, तर रितेश गुजर, केंद्र संचालक यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हेमंत जौजाळ आणि नलिनी मेहर यांनी विशेष सहकार्य केले.

समारोप प्रसंगी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, कौशल्याधारित प्रशिक्षणामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊन त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.