किशोर साहू, मौदा :- मंगळवार (14 जुलै) ला गांगनेर येथे नैसर्गिक शेतीशाळा आयोजित करण्यात आली . कार्यक्रमाला घनश्याम खंडाते यांनी शेतकऱ्यांना बांधावर सेंद्रिय निविष्ठा दशपर्णी,घनजीवाअमृत ,जीवामृत निर्मिती व त्याचा वापर,पशुखाद्य तयार करणे, पशुपालन शेतीला कशाप्रकारे जोडधंदा म्हणून चांगला करता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच दिनेश फुंडे (BTM)यांनी खर्च कमी करण्याकरता जैविक खते वापर व कीटकनाशकाचा दुष्परिणाम, CRT टेकनिक,DSR व DPDC अंतर्गत गटामार्फत बेड मेकर / डिबलर 75%अनुदानावर घेण्याबात सविस्तर माहिती दिली. सहायक कृषी अधिकारी जुमडे यांनी कृषि विभाग अंतर्गत विविध योजना बाबत माहिती देऊन शेतकरी यांनी विचारलेल्या् प्रश्नांचे निराकारण केले. 

प्रशांत शेंडे, स. त. व्य.(आत्मा) यांनी,माती नमुना तपासणी, अझोला चे महत्व, बीज प्रक्रिया हिरवडीचे खताचे महत्व, ट्रायकोडर्मा, बेड वर लागवड केलेले पिकाचे महत्व व उत्पादन याबाबत माहिती दिली. सदर शेतीशाळेत आयोजक माजी सरपंच गांगनेर प्रदीप राऊत यांनी या शेतीशाळाला निवड केलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच श्रीधर वाघमारे, माजी कृषी मित्र, गांगनेर यांनी शेतीशाळेत मोलाचे सहकार्य केलेत.




