नागपूर :- लायन्स क्लब ऑफ नागपूर संस्कृती आणि लिओ लायन्स क्लब ऑफ नागपूर संस्कृती स्टार्स यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम ३० जुलै रोजी नुकताच पार पडला. पदग्रहण समारंभ गणेशपेठ कॉलनी येथील एलिटेस्टे, द राहुल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. लायन्स इंटर नॅशनलच्या डिस्ट्रिक्ट ३२३४ एच १, रिजन- ८, झोन-३ अंतर्गत झालेल्या या सोहळ्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व पदग्रहण अधिकारी PMCC लायन डॉ. राजे मुधोजी भोसले होते. SVDG लायन निशिकांत प्रतापे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर PDG लायन विजय पालीवाल यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. रिजन चेअरपर्सन लायन डॉ. रवींद्र हुसके तसेच झोन चेअरपर्सन लायन बृजरतन लाखोटिया यांचीही प्रमुख उपस्थिती होती. दीपप्रज्वलन, ध्वजवंदन व मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर नव्या सदस्यांचा परिचय व पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे डॉ. राजे मुधोजी भोसले यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देऊन त्यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी मान्यवरांनी लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी विविध सेवा उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. तसेच तरुणाईचा सामाजिक कार्यातील सहभाग वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. लायन्स क्लब ऑफ नागपूर संस्कृतीच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी लायन कविता मेश्राम, उपाध्यक्षपदी लायन रवींद्र माहुलकर, सचिवपदी लायन शकीला अली आणि खजिनदारपदी लायन नाझिया शेख यांनी पदभार स्वीकारला. तसेच लिओ लायन्स क्लब ऑफ नागपूर संस्कृती स्टार्सच्या अध्यक्षपदी लिओ लायन एरिश खान MJF, उपाध्यक्षपदी लिओ लायन फरजान नोमान शेख, सचिवपदी लिओ लायन अरबाज मंसुरी आणि खजिनदारपदी लिओ लायन फरिहा माहीन शेख यांची निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांनी आपल्या मनोगतात आगामी काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स संस्कृती नागपूरच्या फाउंडर प्रेसिडेंट लायन सना गानिया खान PMJF, लायन महेश देशपांडे, सतीश अलोने, कल्याणी भुरे, राजेश भुरे, ईश्वर मेश्राम, शशी मेश्राम, समृद्धी डोंगरे तसेच लिओ लायन सतीश राणे, आरती नामदेव, हिमानी शिवाळे, तुषार पिल्ले, शिव दुबे आणि लिओ लायन युसूफ खान यांचे सहकार्य लाभले. सामाजिक सेवा, नेतृत्व आणि तरुणाईचा सहभाग या त्रिसूत्रीवर आगामी वर्षात प्रभावीपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
लायन्स क्लब ऑफ नागपूर संस्कृती व लिओ लायन्स क्लब संस्कृती स्टार्सचा संयुक्त पदग्रहण सोहळा उत्साहात


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




