– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता. 10) शोध पथकाने 212 प्रकरणांची नोंद करून 1,84,000 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणे या अंतर्गत 10 प्रकरणाची नोंद करून 5,600 रुपयाची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 91 प्रकरणांची नोंद करून 36,400 रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 12 प्रकरणाची नोंद करून 1,200 रूपयाची वसुली करण्यात आली.
दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. 400 दंड) या अंतर्गत 15 प्रकरणाची नोंद करून 6,000 रूपयांची वसुली करण्यात आली. शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस अशा संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 25 प्रकरणांची नोंद करून 50,000 रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर,मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करून 2,000 रूपयाची नोंद करण्यात आली. वर्कशॉप,गॅरेजेस व इतर दुरूस्तीचे व्यवसायिकाने यांनी त्यांचा कचरा 4 प्रकरणाची नोंद करून 4,000 रूपयाची वसुली करण्यात आली.सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत 4 प्रकरणाची नोंद करून 14,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मघे डिसेलटींग चेम्बर नसने, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण परसवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 9 प्रकरणाची नोंद करुन 50,000 रुपयाची वसुली करण्यात आली. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे किंवा बांधकामा दरम्यान चेंबर क्षतीग्रस्त करणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 37 प्रकरणांची नोंद करून 7,400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने विनापरवानगी विद्युत खांबावर फलक लावल्यामुळे 4 प्रकरणाची नोंद करून रू. 20,000 दंड वसुल करण्यात आले. प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 14 प्रकरणाची नोंद करून रू. 70,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकणे/पसरविल्यामुळे 6 प्रकरणाची नोंद करून रू. 60,000 चे दंड वसुल करण्यात आले. रस्त्यालगत सी अँड डी वेस्ट टाकल्यामुळे 3 प्रकरणाची नोंद करून रू. 20,000 दंड वसुल करण्यात आले. बोरवेलचे काम करतांना, पिठाची गिरणी किंवा जुनी इमारत पाडताना होणाऱ्या वायुप्रदुषण किंवा ध्वनी प्रदुषणामुळे 2 प्रकरणाची नोंद करून रू.10,000 दंड वसुल करण्यात आले. हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसल्यामुळे व कचरा शुल्क न भरल्यामुळे 13 प्रकरणाची नोंद करून 70,000 चे दंड वसुल करण्यात आले. शासकीय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्य/कचरा टाकून अडथळा निर्माण करणे किंवा बांधकामा दरम्यान चेंबर क्षतीग्रस्त केल्यामुळे 1 प्रकरणाची नोंद करून रू. 5,000 दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 43 प्रकरणांची नोंद करून रू. 2,55,000 दंड वसुल केला.





