नागपूर :- महानगरपालिका लकडगंज झोन क्र. 08 अंतर्गत दि. 08.08.2026 रोजी महापौर, म.न.पा. यांचे सभेमध्ये शहरातील अनाधिकृत सुरु असलेले कारखाने, शॉपींग मॉल व इमारती व इतर याच्यावर कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आज दि. 13.08.2026 रोजी प्रभाग क्र. 04 येथील मे. डहरवाल, प्लॉट नं. 02 विजयनगर, भरतवाडा यांच्याकडे विनापरवाना कारखाना चालविण्या प्रकरणी लकडगंज झोन क्र. 8, म.न.पा. नागपूर मार्फेत नोटिस कार्यवाही करण्यात आली.
सर्दहु कार्यवाही झोनचे सहा. आयुक्त विजय थुल, उप अभियंता विजेन्द्र सहारे, अग्निशमन अधिकारी कळमना फायर स्टेशन शेख अकलीम, तसेच एन.डी.एस. पथक व इतर कर्मचारी हयांच्याद्वारे कार्यवाही करण्यात आली.





