spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवघ्या पाचव्या वर्षी अरहंत नितेश थुलची विश्वविक्रमाकडे झेप

– ‘यंगेस्ट मेमरी जिनियस’ म्हणून नोंद; नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ब्रेक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंदणी:

नागपूर :- महाराष्ट्रातील अवघ्या पाच वर्षांच्या अरहंत नितेश थुल या चिमुकल्या बुद्धिमान बालकाने आपल्या असामान्य स्मरणशक्ती, मानसिक गणितातील कौशल्य, आत्मविश्वास आणि विविधांगी प्रतिभेच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. अरहंतच्या या प्रतिभेची दखल नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली असून, त्याची नोंद ‘यंगेस्ट मेमरी जिनियस –अ मल्टिटॅलेंटेड वंडर किड’ म्हणून करण्यात आली आहे. त्याची ही कामगिरी ब्रेक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून नोंदविण्यात आल्याचे प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. अरहंत नितेश थुल याने अत्यंत लहान वयात स्मरणशक्ती, मानसिक गणित, सार्वजनिक वक्तृत्व, संवादकौशल्य, सामान्य ज्ञान तसेच राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांबाबतचे ज्ञान या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय क्षमता प्रदर्शित केली आहे. त्याच्या शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रमांमधील कामगिरीतून त्याची विलक्षण आकलनशक्ती, शिकण्याची क्षमता, एकाग्रता आणि आत्मविश्वास प्रकर्षाने दिसून येतो. अवघ्या पाचव्या वर्षी अरहंतने मिळविलेली ही विशेष ओळख त्याच्या बहुआयामी प्रतिभेचे प्रतीक मानली जात आहे. लहान वयातच कठीण गणिती उदाहरणे मानसिक पद्धतीने सोडविणे, विविध माहिती लक्षात ठेवणे तसेच आत्मविश्वासाने आपले ज्ञान मांडणे यामुळे अरहंतने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या कौशल्यांमागे सातत्यपूर्ण सराव, शिकण्याची आवड आणि कुटुंबीयांचे मार्गदर्शनाचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. नोबल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रमाणपत्रा नुसार अरहंत नितेश थुल याची ही कामगिरी NWR Record No. IN24103565 या क्रमांकाने नोंदविण्यात आली आहे. प्रमाणपत्रावर ६ ऑक्टोबर २०२६ ही तारीख नमूद असून, संबंधित नोंद ‘Keepers of the Noble World Records’ या संस्थेअंतर्गत करण्यात आली आहे. अरहंतच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एवढ्या कमी वयात विविध क्षेत्रांमध्ये आपली बुद्धिमत्ता आणि कौशल्य सिद्ध करणारा अरहंत हा इतर बालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याची मेहनत, जिज्ञासा, आत्मविश्वास आणि शिकण्याची वृत्ती यामुळे भविष्यात तो आणखी मोठ्या यशाची शिखरे गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लहान वय, मोठी कामगिरी आणि असामान्य बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम असलेल्या अरहंत नितेश थुलच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बालवयातच मिळालेली ही जागतिक स्तरावरील नोंद अरहंतच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Popular Articles