spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

….. अखेर थ्री फेज लाईन २० तास मंजूर !

– चाचेर येथील भाजपा किसान आघाडी जिल्हा मंत्री रामटेक (ग्रामीण) विनोद कोपरकर यांच्या सतत पाठपुराव्याला यश

किशोर साहू :मौदा :- चाचेरसह रामटेक आणि मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेती पंपासाठी केवळ १२ तास वीज मिळत असल्याने धान पेरणी आणि रोवणीच्या काळात शेतकरी संकटात सापडला होता. या गंभीर समस्येला वाचा फोडण्यासाठी चाचेर येथील भाजपा किसान आघाडी रामटेक जिल्हा (ग्रामीण) चे मंत्री विनोद जगन्नाथ कोपरकर यांनी दि. ०३/०८/२०२४ रोजी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व मुख्य अभियंता, विद्युत विभाग, नागपूर यांना सविस्तर निवेदन दिले होते. खरीप हंगामात धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते, पावसाचा खंड पडल्याने शेतकरी पूर्णपणे विहीर व बोअरवेलच्या कृषी पंपावर अवलंबून आहे, परंतु थ्री-फेज लाईन वेळेवर न मिळाल्याने मोटार पंप चालत नाहीत आणि रोवणी केलेले धान करपण्याची भीती आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते. याबाबत ते सतत पाठपुरावा करत होते.

त्या पत्राची दखल घेत अखेर शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

आता शेतकऱ्यांना रात्री १० वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सलग २० तास थ्री फेज (3 Phase) वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. यामुळे सिंचनाच्या कामाला मोठी गती मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या निर्णयाबद्दल चाचेरच्या सरपंचा लुंबिनी महेश कलारे, सुरेश खंडाईत, प्रल्हाद काळे, अनंता काळे, व्यंकट जुजारप्पू, प्रकाश वाकलपुडी, सुरेश काळे, योगराज घोरपडे, महेश महादुले, नरेश बादुले, बाळा खंडाईत, राजू धोटे, प्रभाकर दरवई, मोरेश्वर किरपान, कृष्णाजी नागमोते, वासुदेव सोमकुवर, निलकंठ बावनकुळे, चिंटू सोमनाथे यांच्यासह समस्त शेतकऱ्यांनी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि या मागणीचा सतत पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद कोपरकर यांचे आभार मानले आहेत.

> “शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले याचे समाधान आहे,” अशी प्रतिक्रिया विनोद कोपरकर यांनी दिली.

Popular Articles