किशोर साहू, मौदा :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी यावर्षी अपंगांची दिवाळी गोड व्हावी म्हणून दिवाळीचा आनंदाचा शिधा अपंग लोकांना भेट स्वरूपात दिला. त्या कीटचे वाटप शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे यांच्या नेतृत्वातील चमुने अरोली येथील अपंग बांधवांच्या घरोघरी जाऊ वाटप केले. या प्रसंगी अपंग लोकांना खूप आनंद झाला व त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच गावातील लोकप्रतिनिधी यांचे खूप आभार मानले. अपंग लोकांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघून कीट वाटणाऱ्या चमूला समाधान वाटले. यावेळी चमूच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व अपंगांना तसेच गावकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी किट वाटणाऱ्या चमूमध्ये तालुका शिवसेनाप्रमुख प्रशांत भुरे, सरपंचा रोशनी प्रशांत भुरे, माजी उपसरपंच कैलास समरीत, ग्रा पं सदस्य विकास समरीत, निलेश डहारे, सामाजिक कार्यकर्ते गणेश बावनकुळे, शुभम मेहर सह गावातील इतरही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने समावेश होता.






