spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

– उमरखेडजवळ घडला अपघात

यवतमाळ :- पुसदवरून उमरखेडकडे येत असलेल्या हदगाव डेपोच्या अकोला-हदगाव बसने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान कुपटी जवळील कृषी महाविद्यालयासमोर घडली.

नंदू देवराव भुसारे (४५, रा. गंगणमाळ ता. उमरखेड) असे मृताचे नाव आहे. एमएच-२०/बीएल-२३३६ क्रमांकाची बस उमरखेडकडे येत होती. नंदू भुसारे हे उमरखेडवरून आपल्या गावाकडे एमएच-२९/एवाय-८००६ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने भुसारे यांना तत्काळ उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच उमरखेड आगारप्रमुख प्रबोधिनी किनाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता.

Popular Articles