– ३ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोंढाळी :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक १४/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलीस स्टेशन, नागपूर ग्रामीण यांच्या सहकायनि तांत्रिक विश्लेषण, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणुन एकुण ०३ लाख ७४ हजार ५००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक १४/११/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोस्टे कोंढाळी अप क. ८२८/२६ कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ (अ) भान्यासंचे समांतर तपास करीत असता तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात घरफोडी करणारे गुन्हेगार यांनी सिल्वर रंगाचे मारुती सुझुकी डिजायर वाहन वापरल्याची माहिती मिळाल्यावरून वाहनाची संपुर्ण माहीती हस्तगत करून तसेच सदरचे वाहन हे अभिलेखावरील आरोपी मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद, वय २५ वर्ष, रा. बडा ताजबाग यासीन प्लॉट समोर मैदान, नागपूर हा वापरत असल्याची माहिती मिळाली वरून सदर वाहनासह आरोपी १) मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद, वय २५ वर्ष, रा. बडा ताजबाग यासीन प्लॉट समोर मैदान नागपूर आणि त्याचे साथीदार आरोपी २) अयान उर्फ तुटल्या वसीम कुरेशी वय १९ वर्ष, रा. बडा ताजबाग सिंधी बंद किराणा दुकानाजवळ नागपूर ३) मोहम्मद रियाज मोहम्मद रफीक शेख वय २४ वर्ष, रा. बडा ताजबाग अवलिया नगर पिली स्कूल जवळ नागपूर यांना नागपुर येथुन ताब्यात घेतले. आरोपींकडे कौशल्यपुर्ण तपास करीत गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन कोंढाळी परिसरात मध्यरात्री घरफोड़ी करून नमुद गुन्हा केल्याचे कबूल केले.
पोलीसांनी पंचासमक्ष नमुद गुन्हयात चोरीस गेलेले चांदीचा ऐवज मारुती सुझुकी डिजायर क्र. एम एच ०६/ए यु-१८०० किंमती ३,००,०००/- रूपये, २ अँड्रॉइड मोबाईल, १ आईफोन व इतर वस्तू असा एकुण ३,७४,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे.






