spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध दारूविक्री व सेवनाविरोधात मोहीम

नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री तसेच सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०५ गुन्हे दाखल करून एकुण ४७७५/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पोलीस स्टेशन बेला येथे आरोपी नामे निलेश धनराज वानखेडे, वय ३८ वर्ष, रा. सोनगाव (लोधि) ता. जि. नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन कोंढाळी येथे आरोपी नामे सुनिल किसन चव्हाण, वय २८ वर्ष, रा. पुसागोंदी याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे उमेश नारायण कनिरे, वय ३९ वर्ष, रा. वार्ड क्रमांक ५, खैरगाव तह. नरखेड याचेवर ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन वेलतूर येथे आरोपी नामे प्रकाश बंडुजी भगत, वय ४५ वर्ष, रा. कुजबा, ता. कुही याचेवर ०१ गुन्हा नोंद. पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपी नामे बबलु हरजी पवार, वय ३२ वर्ष, रा. शिवनफळ तांडा, ता. भिवापुर याचेवर ०१ गुन्हा नोंद. सदर कारवाईत एकुण १०१७० मिली देशी दारू असा एकुण ४,७७५/-रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.

Popular Articles