spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडेलवारा येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम

तिरोडा :- नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था, चांदोरी बुज यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडेलवारा येथे विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रविण खेडीकर संस्थापक नलिनी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था चांदोरी बूज यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, दारू, सिगारेट तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. व्यसनांपासून दूर राहणे हे आरोग्यदायी जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे, याबाबत त्यांनी सोप्या उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी केले.

Popular Articles