Home Latest News रानडुकरीच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यू

रानडुकरीच्या धडकेत दुचाकीस्वाराच्या मृत्यू

0

<p><strong>सचिन चौरसिया&comma; प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> रानडुकराने धडक दिल्यानंतर दुचाकीला झालेल्या अपघातात मंगेश छन्नीलाल नागपुरे &lpar;वय ३७&rpar; या तरुणाचा जागीच मृत्यू झाला&period; ही घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन-आजनी रोडवरील लहान कालव्याजवळील वळणावर येथे घडली&period; माहितीनुसार मंगेश नागपुरे &lpar;वय ३७&rpar; हा शेती व्यवसाय सोबत नगरधन येथे सूर्य लक्ष्मी कॉटन मिल्स मध्ये कार्यरत होता&period; कंपनीत आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी तो आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ४०&comma; एव्ही ८७९६ ने सामना संपवून घरी परत येत असताना नगरधन-आजनी रोडवरील लहान कालव्याजवळ रानडुकरांच्या कळप रस्त्यावर आला&period; एका रानडुकराने त्यांना धडक दिली&period; खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला&period; यांच्या जागीच मृत्यू झाला&period; घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आले&period; पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून&comma; मंगेश नागपुरे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे&period; अकस्मात मृत्यूने कुटुंबावर दुःखाच्या डोंगर कोसळला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नगरधन-आजनी रोडवर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असूनही कोणतेही सूचना फलक&comma; दिशादर्शक चिन्हे किंवा &OpenCurlyQuote;अपघातप्रवण क्षेत्र’ दर्शवणारे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत&period; यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे&period; या घटनेनंतर तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात&comma; अशी जोरदार मागणी होत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version