spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

एनएमआरडीए हद्दीत मनपाची बस सेवा चालविण्याकरिता ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याचे आयुक्तांचे निर्देश

– मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी घेतला परिवहन विभागाचा आढावा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाशी संबंधित विविध विषयांबाबत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी बुधवारी (ता.27) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी एनएमआरडीए हद्दीत मनपाची बस सेवा चालविण्याकरिता ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त अंकित, उपायुक्त राजेश भगत, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, अजय पझारे, परिवहन प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे यांच्यासह, ऑपेरेशन व्यवस्थापक राजीव घाटोळे, प्रशासनिक व्यवस्थापक गजानन नागूलवार, एनएमआरडीएचे अधीक्षक अभियंता आणि एमएसआरटीसीचे विभागीय वाहतूक अधिकारी रंजना घोडमारे , महावितरण चे  परांजपे , मे. चलो मोबिलिटी प्रा. लि., यांच्यासह इतर ऑपरेटरन प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी परिवहन विभागाविषयक विविध प्रलंबित कामे, एनएमआरडीए हद्दीतील शहर बस सेवा, खापरी डेपो येथील मिहानच्या जागेचे हस्तांतरण, तसेच ‘पीएम ई-बस’ योजनेअंतर्गत खापरी डेपोतील आणि वाठोडा बस डेपो अंतर्गत स्थापत्य विषयक विविध कामांबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी एनएमआरडीए हद्दीत 7 मार्गावर मनपाची बस सेवा चालविण्याकरिता एक ‘फायनान्शियल मॉडेल’ तयार करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये बस नेमक्या कोणत्या मार्गांवर धावणार, प्रत्येक बसच्या वाहतुकीवर येणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबतची सविस्तर माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच, मनपाचे अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन विभागाशी संबंधित विविध विभागाशी संबंधित असलेल्या अडचणी, डेपो, बस ऑपरेटर, कॅफो, राज्य सरकार, महावितरण, एमएसआरटीसीशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न, त्यांचे करण्यात येणारे निराकरण, विकासकामे आणि भविष्यात नवीन काय उपाययोजना करता येतील, या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.