Home Latest News कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक नोंदी ऑनलाईन करण्यावर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक नोंदी ऑनलाईन करण्यावर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

0

<p><strong>&&num;8211&semi; सेवा पंधरवड्यानिमित्त सेवापुस्तक अद्ययावतीकरण कार्यक्रमाचे आयोजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> सेवा पुस्तक हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या इतिहासाची&comma; शैक्षणिक माहितीची&comma; बढतीची आणि इतर सेवा-संबंधित तपशीलांची नोंद असलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे&period; हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेचा एक अभिलेख म्हणून कार्य करते&period; वर्ग एक व वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांच्या सेवा विषयक महत्त्वाच्या नोंदी eHRMS प्रणालीवर नोंदविल्या आहेत&period; त्याप्रमाणेच वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या देखील सेवाविषयक महत्त्वाच्या नोंदी ऑनलाईन प्रणालीवर घेण्याबाबत प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे&period; तहसील स्तरावर प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्ती प्रकरणाचा देखील आढावा व प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील&comma; असे जिल्हाधिकारी डॉ&period; विपीन इटनकर यांनी आज येथे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज सेवा पंधरवड्यानिमित्त सेवा पुस्तक अद्ययावतीकरण व तपासणीचे आयोजन करण्यात आले होते&period; यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते&period; यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे&comma; तहसिलदार स्नेहलता पाटील मेंढे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की&comma; निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या नेतृत्वात एका चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे&period; सेवेतील सर्व नोंदीची पडताळणी केली जाते&period; सेवापुस्तकात कोणतेही खोडतोड किंवा चुकीच्या नोंदी नाहीत याची खात्री केली जाते&period; सर्व नोंदी योग्य पद्धतीने प्रमाणित केल्या जातात&period; कर्मचाऱ्यांच्या सेवेतील प्रगतीचे योग्य दस्तऐवजीकरण होते&period; सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील प्रगतीचे दस्तऐवजीकरण करते&period; यामुळे सर्व नोंदी अद्ययावत राहतात आणि कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेचा संपूर्ण इतिहास मिळतो&period; सेवापुस्तकांमध्ये सर्व नोंदी योग्य व नियमांनुसार केल्या जाव्यात&comma; असे ते पुढे म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>सेवा पंधरवडा हा राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस &lpar;१७ सप्टेंबर&rpar; ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती &lpar;२ ऑक्टोबर&rpar; या काळात साजरा होणारा कार्यक्रम आहे&period; या पंधरवड्याअंतर्गत ज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव तसेच इतर नोंदींची नोंद असलेल्या सेवा पुस्तकाचे &lpar;सर्व्हिस बुक&rpar; अद्ययावतीकरण व तपासणी केली जात आहे&period; या काळात शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातील नोंदी तपासून त्या अद्ययावत करण्यावर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेतील प्रगतीचे दस्तऐवजीकरण करण्यावर भर दिला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version