spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फटाक्यांमुळे कांदा चाळीला आग; केडगावच्या दोन शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

केडगाव :- दिवाळीच्या सणादरम्यान फटाके पेटविण्याच्या निष्काळजीपणामुळे केडगाव (ता. दौंड) येथील दोन शेतकऱ्यांच्या कांदा चाळींना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. धुमळीचा मळा परिसरातील मसोबा नगरनजीक ही घटना घडली.

शेतकरी गणेश सुरेश हिंगणे आणि प्रमोद बाळू बारवकर यांच्या कांदा चाळींना अज्ञात व्यक्तीने फटाके पेटवल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आगीच्या प्रचंड ज्वाळांमुळे परिसरातील एक मोठे झाडही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांच्या प्रयत्नांमुळे आग अधिक पसरली नाही. मात्र, या आगीत दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात फटाके वाजविताना घेतलेल्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. फटाके पेटविताना शेतातील पिके, कांदा चाळी आणि इतर ज्वलनशील वस्तूंची काळजी घेण्याची गरज या घटनेतून निर्माण झाली आहे.

Popular Articles