spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत मोफत वैद्यकीय व दंत तपासणी शिबीर

गडचिरोली :- जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे बुधवार, दि. ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान अंतर्गत मोफत वैद्यकीय व दंत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

शिबिराची वेळ व ठिकाण

हे शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथील बाह्यरुग्ण विभागात सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

तपासण्या व उपचार सेवा

शिबिरामध्ये खालील महत्त्वाच्या आजारांबाबत तपासण्या, निदान व उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत –

पौष्टिक आहार व पोषण जागृती, सिकल सेल, थैलेसेमिया, अॅनिमिया व हिमोफिलिया तपासणी, मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम, दंत तपासणी व नेत्ररोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, क्षयरोग तपासणी, स्वच्छता व आरोग्य विषयक राष्ट्रीय कार्यक्रमांअंतर्गत जनजागृती

या शिबिरात नेत्ररोग अधिकारी, दंतचिकित्सक, शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, भिषक, आयुष वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेद व होमिओपॅथी) तसेच तज्ञ अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

महिलांसाठी विशेष जागृती

शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, मातृ व बाल आरोग्य तसेच पोषण या विषयांवर विशेष भर देण्यात येईल. सर्व तपासण्या व उपचार सेवा पूर्णपणे विनामूल्य दिल्या जातील.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांनी जिल्ह्यातील महिला, किशोरवयीन मुली तसेच सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. “स्वस्थ नारी, सशक्त परिवार – निरोगी समाज” हा संदेश आपण घराघरात पोहोचवू या, असेही त्यांनी नमूद केले.

आवश्यक कागदपत्रे

शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी विशेषतः महिलांनी आधार कार्ड, राशन कार्ड, आभा कार्ड व आयुष्मान कार्ड सोबत आणावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

Popular Articles