spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीपीआयडी व आक्रमण युवक संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

नागपूर :- भारतरत्न महामानव प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (PPID) व आक्रमण युवक संघटने तर्फे इमामवाडा स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमात बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अशा प्रकारचे जयघोष करण्यात आले. याप्रसंगी अभिवादन करते वेळी आक्रमणचे पूर्व विदर्भ संयोजक प्रमोद पाटील नागपूर जिल्हा प्रभारी व इन्चार्ज ओपूल तामगाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. पीपीआयडी चे राज्य कार्यकारणी सदस्य राहुल मडामे आक्रमण जिल्हाध्यक्ष विशाल बनसोड, सुरज पुरानिक, संदीप चव्हाण, अजय गायकवाड, अश्विन पाटील, दीपक पाटील, अडकिने , दर्शन तामगाडगे, राजू मेश्राम, कमल मनपिया, रितेश ढेंगरे रामदास जोगदंडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थितीत राहून सर्वांनी अभिवादन कार्यक्रम पार पाडला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.