spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर :- संताजी परिषदेच्या तर्फे आयोजित नरेंद्रनगर व मनीषनगर येथे ७ व ८ डिसेंबर रोजी दोन दिवसीय संताजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी सायंकाळी ६ वाजता जगनाडे महाराजांचे पूजन -भजन कीर्तन – आणि काल्याचे आयोजन केले आहे. संताजी समता परिषद व श्री संताजी स्नेही मंडळ नरेंद्रनगर व मनीषनगर च्या वतीने संताजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून ही रॅली सोमवारी 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाजन आटा चक्की च्या मागील ग्राउंडवर करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पाहुणे म्हणून नागपूरचे पालकमंत्री तसेच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रमुख अतिथीमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडेल. संताजी परिषदेचे सरचिटणीस किशोर चेन्ने यांनी हे आयोजन केले आहे. रॅली ची सुरुवात महाजन आटा चक्की येथून सुरू होणार असून मनीष नगरच्या अंडरपास ग्राउंड मधून जाऊन सोमलवाडा मार्गे राजीव नगर मध्ये समापन होईल. या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन किशोर चन्ने यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.