नवी दिल्ली :- देशाच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या 108 व्या जयंती दिनी महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.
निवासी आयुक्त तथा सचिव डॉ.श्वेता सिंघल यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव डॉ.श्वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी शपथ दिली.






