spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फुटाळा पार्किंगमधील अनधिकृत शेडवर मनपाचा हातोडा; शहर अतिक्रमणमुक्त मोहिमेला वेग”

नागपूर :- महानगरपालिकेच्या वतीने फुटाळा परिसरातील एनएमसी पार्किंगमधील अनधिकृत शेडवर आज धडक निष्कासन कारवाई करून ते पाडण्यात आले आहेत. या अतिक्रमणामुळे पार्किंगच्या जागेत अडथळा निर्माण होत होता, जो आता पूर्णपणे दूर करण्यात आला आहे. शहरातील सार्वजनिक जागा आणि रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी महापालिकेची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा नियमानुसार कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे नागपूर शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे..

सदर कारवाई आयुक्त मनपा नागपूर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त  राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी चे अतिक्रमण कर्मचारी व केद्रीय अतिक्रमण पथक संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.

नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटतात नागरिकांना मोकळे करुन देने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Popular Articles