spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्वातंत्र्य दिनानिमित्त केशव नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिर

पांढरकवडा :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केशव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी, शाखा पांढरकवडा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर डॉ. हेडगेवार रक्त केंद्र यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले असून, जुनी HDFC बँकेजवळ, वीर सावरकर चौक, पांढरकवडा येथे सकाळी १० वाजल्यापासून रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे.

“रक्तदान करा, जीवन वाचवा” या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे हा आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे तरुणांसह सर्व पात्र नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे. “स्वातंत्र्य हे एक वरदान आहे, त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे,” या संदेशाला सामाजिक सेवेशी जोडत स्वातंत्र्य दिनी रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान शिबिर यशस्वी करण्याचे आवाहन केशव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वणी – शाखा पांढरकवडा यांच्याकडून करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.