spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पवित्र दीक्षाभूमीवर माघ पौर्णिमेच्या पर्वावर महापरित्राण पाठ व धम्मदेशना कार्यक्रम 1 फरवरीला

नागपूर :- पवित्र दीक्षाभूमीवरील महापरित्राण पाठ धम्मदेशना कार्यक्रम रविवार दिनांक 1 फरवरी 2026 रोजी, आयोजित करण्यात येत आहे. बुद्ध संस्कृतीमध्ये माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान बुद्धाने वैशालीच्या चापाल चैत्यामध्ये आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. माघ पौर्णिमा ही बौद्ध राष्ट्रांत भगवान बुद्धांची करुणा, प्रज्ञा व मैत्रीचा पावन उत्सव म्हणून ओळखल्या जातो. या मंगल पर्वावर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर आणि भिक्खू – भिक्खुणी संघ व उपासक – उपासिका संघाच्या संयुक्तविद्यमाने रविवार दिनांक १ फरवरी रोजी, सकाळी १० वाजता. महापरित्राण पाठ व विशेष धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना विनंतीपूर्वक उपस्थित राहण्याचे आवाहन विलास गजघाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेत.

Popular Articles