Home Latest News राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी

राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी

0

<p><strong>नागपूर&colon;<&sol;strong> मराठवाडा परिसरात गेल्या काही दिवसांत आलेल्या पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे&period; वाचनालये बंद असून अभ्यास साहित्याचे नुकसान झाले आहे&period; तसेच वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>येत्या २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा होणार आहे&period; परंतु सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे तसेच केंद्रांवर वेळेवर पोहोचणे अवघड झाले आहे&period; त्या अनुषंगाने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे की राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी&comma; जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल&period; ही बाब सार्वजनिक हिताची असल्याने आपण आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या या अडचणी प्रकाशझोतात आणून शासन व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून द्यावे&comma; ही नम्र विनंती&comma; अशी मागणी मराठवाड्यासह विदर्भ&comma; नागपूर आणि इतर भागातील विद्यार्थ्यांकडून केले जात आहे&period; मात्र या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नसला तरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे&period; त्यानुसार&comma; अधिपत्याखालील शासकीय &sol; दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट-क तांत्रिक&sol;अतांत्रिक संवर्गातील सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्याकरिता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर सुरु आहे&period;सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी मागील आठवडयापासून अती मुसळधार पावसामुळे राज्यामध्ये अपात्कालीन पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने २५&period;०९&period;२०२५ व २६&period;०९&period;२०२५ रोजीची आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे&period; याबाबतचे सुधारीत वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने &lpar;एमपीएससी&rpar; २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे&period; यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबरला होणारा आहे&period; मात्र अभ्यासक्रमात बदल झाल्यानंतरच्या या पहिल्याच परीक्षेवर विघ्न येण्याची शक्यता आहे&period; राज्यभरातील लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत&period; ऐन परीक्षा तोंडावर आली असतानाच राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे&period; त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी केली जात आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आयोगाने यंदा २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे&period; त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी मुंबई&comma; पुणे&comma; नागपूर अशा विविध शहरांमध्ये राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहे&period; आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येणे अपेक्षित होते&period; त्यामुळे विद्यार्थी सातत्याने या परीक्षेच्या जाहिरातीची चातकाप्रमाणे वाट बघत होते&period; परंतु&comma; आयोगाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत होता&period; मागील काही महिन्यांपासून &OpenCurlyQuote;एमपीएससी’च्या अनेक परीक्षांचे निकाल मुलाखती रखडल्याची उमेदवारांची ओरड आहे&period; त्यात राज्यसेवेची जाहिरातही येत नसल्याने आयोग नेमका कुठला ब्रह्ममुहूर्त शोधत आहे&comma; असा प्रश्न उपस्थित केला जात होता&period; अखेर आयोगाने ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आणि त्यानंतर आता २८ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; lokstta<&sol;p>&NewLine;

Exit mobile version