spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपाच्या शिवणयंत्र क्लस्टरचे अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.यांच्या हस्ते उद्‌घाटन

– महिलाना मिळणार शिवणकामचे प्रशिक्षण 

नागपूर :- दीनदयाल अंत्योदय योजना–राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून नागपूर महानरपालिकेच्या समाज विकास विभाग आणि आरोह मल्टीपरपज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पारडी, पुनापूर येथील कौशल्य विकास केंद्र येथे उभारण्यात आलेल्या स्वयंसहायता समूहातील महिलांकरिता शिवणयंत्र क्लस्टर आणि रोजगार निर्मिती प्रकल्पचे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, यांच्या हस्ते शनिवारी (ता.४) उद्‌घाटन करण्यात आले.

याप्रसंगी लकडगंज झोनचे सहायक आयुक्त विजय थुल, समाज विकास विभागाचे अधीक्षक राजेश मेश्राम, नूतन मोरे, विनय त्रिकोलवार, रितेश बांते, विनय टेंभूर्णे, आरोह संस्थेचे अध्यक्ष विशाखा राव, मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी, निशिकांत जाधव इतर पदाधिकारी यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी वैष्णवी बी. म्हणाल्या की, महिलांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, त्याकरिता महिलांनी स्वतः पुढे येण्याची तसेच आपले प्रशिक्षण पूर्ण करण्याची गरज आहे. महिलांना रोजगार आणि कौशल्य मिळवून देणे ही महानगरपालिकेची पहिली प्राथमिकता आहे. महिलांना पुढे जाण्याकरिता ज्या प्रकारची मदत लागते, ती सर्व मदत मनपा मदत करेल. महिला सक्षम झाल्या तर संपूर्ण कुटुंबाचा विकास होईल, याकरिता मनपातर्फे आवश्यक पूर्ण मदत केली जाईल असे आश्वासन वैष्णवी बी.यांनी यावेळी दिले. प्रशिक्षण केंद्रातून तयार होणारे उत्पादनाची गुणवत्ता दर्जेदार ठेवा आणि ऑनलाईन उत्पादन करण्याचाही प्रयत्न करावा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, यांनी केल्या.

प्रास्ताविक करताना आरोह संस्थेच्या विशाखा राव यांनी आरोह करीत असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच महिलांना प्रशिक्षण देऊन सुंदर उत्पादन केले जात आहे. तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि महिलांचे सक्षमीकरण केले जात असल्याची माहिती दिली.

यावेळी समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उद्घाटन सोहळ्यात प्रशिक्षणार्थी महिलांकडून स्वागत गीत सादर करण्यात आले. संचालन शर्मिष्ठा गांधी, आभार शारदा भुसारी यांनी मानले.

Popular Articles