Home Latest News ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता NCMC कार्ड अनिवार्य

0

<p><strong>-१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डद्वारेच<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या &lpar;एसटी&rpar; विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक&comma; ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनसीएमसी &lpar;NCMC&rpar; कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे&period; सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून&comma; त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते&period; त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक&comma; ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे&period; या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे&period; त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे&period; ज्या प्रवाशांकडे कार्यरत &lpar;Active&rpar; NCMC कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे&comma; त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक&comma; ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना NCMC कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे&period; ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून&comma; या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे&period; त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी भीम ॲप &lpar;BHIM App&rpar; द्वारे Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे&period; कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करून Top-up करता येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दरम्यान&comma; आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे&period; आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक&comma; डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने NCMC कार्ड प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार असून&comma; ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version