Home Latest News २५ मे पासून नव ताप्याला होणार सुरूवात; उष्णतेची लाट २ जूनपर्यंत कायम...

२५ मे पासून नव ताप्याला होणार सुरूवात; उष्णतेची लाट २ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे&period; गेल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत असून&comma; अनेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे&period; बुधवारी नागपूरचे कमाल तापमान तब्बल ४६&period;६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले&period; कडक उन्हाचा तडाखा&comma; उष्ण वारे आणि दुपारच्या वेळी निर्माण होणारी प्रचंड उकाड्याची परिस्थिती यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे&period; रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत असून&comma; नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे लागत आहे&period; हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार&comma; २५ मेपासून &OpenCurlyDoubleQuote;नव ताप्या” ला सुरुवात होणार असून&comma; ही उष्णतेची तीव्र लाट २ जूनपर्यंतकायम राहण्याची शक्यता आहे&period; त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे&period; या काळात भरपूर पाणी पिणे&comma; डोक्यावर संरक्षण ठेवणे&comma; दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळणे आणि लहान मुले&comma; वृद्ध तसेच आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे&period; लोकमान्यतेनुसार &OpenCurlyDoubleQuote;नव ताप्या”च्या दिवसांत गोरगरिबांना पाणी&comma; ताक&comma; फळे किंवा अन्नदान केल्यास पुण्य लाभते&comma; असे मानले जाते&period; त्यामुळे अनेक सामाजिक संस्था आणि नागरिकांकडून पाणपोई&comma; शरबत वाटप आणि सेवा उपक्रम राबविले जात आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version