हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर शहरातील शिवाजी नगर रेल्वे लाईन परिसरातील खुल्या जागेत गांजा ओढणाऱ्या नागपूरच्या दोन तरुणांना तुमसर पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील अंशुल नरेंद्र घरडे (वय २१, रा. हिंगणा) आणि कार्तिक राजू वळमे (वय २०, रा. डोंगरगाव) हे दोघे चिलममध्ये गांजा ओढत असल्याची गोपनीय माहिती मिळताच डी.बी. पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत आरोपींकडून १ लाख रुपये किमतीची सुझुकी एक्सेस मोपेड गाडी (क्र. MH 40 DB 8843), व्हिवो आणि रिअलमी कंपनीचे दोन मोबाईल, चिलम व इतर साहित्य असा एकूण १ लाख ४० हजार १२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव आणि पोलीस निरीक्षक सुभाष बारसे व बाळासाहेब आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम, हवालदार पंकज बाहेकर, अमोल आदमने आणि डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी केली असून पोलीस उपनिरीक्षक सयाम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तुमसरमध्ये गांजा ओढणाऱ्या नागपूरच्या दोन तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; १.४० लाखांचा मुद्देमाल जप्त









