Home Latest News ऋषिपंचमीपूर्वी नदीघाटाचा प्रश्न निकाली काढा; अन्यथा हजारो भाविकांचा जीव धोक्यात!

ऋषिपंचमीपूर्वी नदीघाटाचा प्रश्न निकाली काढा; अन्यथा हजारो भाविकांचा जीव धोक्यात!

0

<p><strong>&&num;8211&semi; चांदणी बर्डी येथील श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रमालगतच्या नदीपात्राकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष&semi; लोकेश काळे यांचा इशारा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मेंढला प्रतिनिधी &colon;- <&sol;strong>नरखेड तालुक्यातील श्री संत भाकरे महाराज सेवा आश्रम&comma; चांदणी बर्डी येथे दरवर्षी श्रावण महिना आणि ऋषिपंचमीच्या पावन पर्वानिमित्त महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात&period; उत्तरवाहिनी नदीत पवित्र स्नान करून भाविक धार्मिक विधी पार पाडतात&period; मात्र यंदा आश्रमालगतच्या नदीपात्राची अत्यंत दयनीय अवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे भाविकांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नदीचे खोलीकरण करण्यात आले असले तरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर काळा चिकण गाळ साचला आहे&period; त्यामुळे नदीत उतरणे अत्यंत धोकादायक बनले आहे&period; अनेक ठिकाणी काटेरी झुडपे&comma; गवत आणि अस्वच्छता पसरली असून भाविक गाळात अडकून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे&period; विशेषतः महिला&comma; ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते&period;<&sol;p>&NewLine;<p>दरवर्षी ऋषिपंचमीच्या दिवशी १५ ते २० हजारांहून अधिक भाविक या ठिकाणी स्नान&comma; दर्शन आणि महाप्रसादासाठी उपस्थित राहतात&period; आश्रम परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम&comma; महाप्रसाद आणि विविध आध्यात्मिक उपक्रम पार पडतात&period; मात्र नदीघाटाची झालेली दुर्दशा पाहता यंदा भाविकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>खरेदी-विक्री संस्थेचे संचालक लोकेश विनोद काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने नदीघाटातील गाळ काढून परिसर स्वच्छ करावा&comma; काटेरी झुडपे हटवावीत&comma; सुरक्षित स्नानघाट तयार करावा&comma; धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स व सूचना फलक लावावेत&comma; तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात&comma; अशी जोरदार मागणी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भाविकांच्या श्रद्धेचा&comma; सुरक्षिततेचा आणि धार्मिक परंपरेचा विचार करून प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत&comma; तर ऋषिपंचमीच्या दिवशी कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील&comma; असा इशाराही लोकेश काळे यांनी दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हजारो भाविकांच्या आस्थेचे केंद्र असलेल्या या पवित्र स्थळाकडे प्रशासनाने केवळ कागदी कामापुरते न पाहता प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने कामे पूर्ण करावीत&comma; अशी मागणी भाविकांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version