Home Latest News संजय राऊतांनी वाईन घेतल्यासारखे झिंगून बोलू नये

संजय राऊतांनी वाईन घेतल्यासारखे झिंगून बोलू नये

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची सणसणीत टीका<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>उन्हाळा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आरोग्याच्या दृष्टीने पुरेसे पाणी पिण्याचे आवाहन केले आहे&period; या आवाहनावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्यात किराणा दुकानांवर वाईनविक्री करण्याची परवानगी द्या&comma; असा प्रस्ताव कोणी आणला होता याची आठवण राहिलेली नाही&period; त्यात संजय राऊत यांच्या संबंधातील कंपनी कुणाची होती&comma; हे महाराष्ट्र विसरलेला नाही&period; तुमचे धोरण वाईन प्या असे होते&comma; तर पंतप्रधानांचे धोरण पाणी प्या असे आहे&period; त्यामुळे &OpenCurlyQuote;पाणी प्या’ म्हटल्यानंतर वाईन प्यायल्यासारखे बोलू नये&comma; अशी बोचरी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली&period; भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>अलीकडच्या काळात संजय राऊतांना वडापाव नव्हे तर खिमा-पाव अधिक प्रिय वाटायला लागलाय&period; कारण खिमा-पाव खाल्ल्यानंतर खिमा-पाव खाणारे आपल्याला मतदान करतील&comma; असे त्यांना वाटतेय&period; मत्स्य पावच्या द्वारे कोकणातील कोळी बांधवांसाठी उत्पन्नवाढीची नवी संधी निर्माण केली जात असेल&comma; तर संजय राऊतांच्या पोटात दुखायचे कारण काय&comma; असा सवाल उपस्थित करून बन म्हणाले की&comma; तुम्ही कितीही दाढ्या कुरवाळल्या&comma; अफजलखान आणि औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही&period; कोळी आणि कोकणी बांधव तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत&period;<&sol;p>&NewLine;<p>संजय राऊतांनी बळी देण्याचे समर्थन केले&period; बकरी ईदच्या निमित्ताने बळी देण्यास आमचा विरोध नाही&period; परंतु सार्वजनिक ठिकाणी बळी द्यायला निश्चितपणे विरोध केला जाईल&period; तुम्हाला बळी द्यायचा असेल तर तुमचा सण घरामध्ये साजरा करा&comma; त्याला आमचा विरोध नाही&period; परंतु मतांसाठी लांगूलचालन करण्यासाठी रस्त्यावर&comma; सार्वजनिक ठिकाणी&comma; सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचे बळी देण्याचे समर्थन दुर्दैवाने जनाब संजय राऊत करत आहेत&period; आज वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राऊतांच्या पेकाटात लाथ घातली असती&period; कारण बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने अशा प्रथा-परंपरांना विरोध केला होता&period; त्यांनी कधीही उघड्यावर नमाज पढणे&comma; किंवा उघड्यावर बळी देणे अशा परंपरेचे समर्थन केले नव्हते याकडे बन यांनी लक्ष वेधले&period;<&sol;p>&NewLine;<p>बन पुढे म्हणाले&comma; रोहित पवार यांनी आपल्या आजोबांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची स्थिती काय होती&comma; याचा थोडासा अभ्यास करावा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारावे&period; आपले आजोबा शरद पवार यांना एकदा विचारले पाहिजे की&comma; &OpenCurlyQuote;आजोबा&comma; तुम्ही दहा वर्ष देशाचे कृषिमंत्री होता तेव्हा महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या का होत होत्या&quest; तुम्ही दहा वर्ष केंद्रात मंत्री होता&comma; तरीही कांद्याचा प्रश्न का सुटला नाही&period; काँग्रेस सरकारने कधीही कांद्याला 15 रुपयांचा हमीभाव दिला नाही&period; आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीत तोडगा निघाला&period; येत्या चार दिवसांमध्ये कांद्याचा प्रश्न संपलेला असेल&period;<&sol;p>&NewLine;<p>भारताकडे पुरेसा इंधनसाठा शिल्लक असल्याचे स्पष्ट करत  बन म्हणाले की&comma; काही लोक जाणीवपूर्वक डिझेल &&num;8211&semi; पेट्रोलचा साठा करत असल्याने काही जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा 50 ते 75 टक्के मागणी वाढलेली आहे&period; कारण काहीजण साठेबाजी करून पेट्रोल &&num;8211&semi; डिझेलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत आहेत&period; राहिला प्रश्न इंधन दरवाढीचा&comma; तर चीनमध्ये जवळपास 25 ते 30 टक्के इंधन दरवाढ झाली आहे&period; पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे आपल्याकडे केवळ चार ते पाच टक्केच इंधन दरवाढ झाली आहे&period; युद्धाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे दर पुन्हा नियंत्रणात येतील&period; सर्वसामान्य नागरिकांना झळ बसू नये यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version