नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. विभागीय लोकशाही दिनात सात तक्रारींवर चर्चा करण्यात आली तर तीन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. याप्रसंगी अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्हा स्तरावर तक्रार अथवा निवेदन सादर केल्यानंतर समाधान न झाल्यास विभागीय स्तरावर आयोजित लोकशाही दिनात अशा तक्रारी संदर्भात निर्णय घेण्यात येतो. 

लोकशाही दिनात जिल्हाधिकारी नागपूर, महानगरपालिका आयुक्त, नागपूर जिल्हाधिकारी तसेच वर्धा आदी कार्यालयाशी संबंधित सहा प्रकरणे तसेच एक नव्याने प्रकरण दाखल झाले आहे. विभागीय लोकशाही दिनात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी तीन प्रकरणे नस्तीबद्ध करण्यात आली आहेत.





